Shri kshetra Bhaktidham

 • भक्तिधाम मधिल उपक्रम :
  1. ज्ञानोदय विध्यामंदिर
  2. ज्ञानेशकन्या गुरुकुल
  3. पुरस्कार प्रदानता(गिता जयंती प्रर्वावर)
  4. गोशाळा
  5. अन्नछत्र
  पायदळ दिंडी: पालखी सोहळा (पंढरपूर) :

  -गुलाब माधुर्य

  पायदळ पालखी दिंडीवरी | नित्य जाऊ लागली पंढरपूरी| महाराजांना नेती खांध्यावरी |भक्तिधामाचे वारकरी ||५७|| ‘रामकृष्ण हरींचा’ जयघोष |वारकर्‍यांचा आनंदोल्हास| पाडुरंग भेटीचा मनोल्हास|नित्य घडे||५८||पिटुकले बीज पडले|वटवृक्षात रूपांतर झाले| पालखीचेही रुप पालटले|झाली शाही पालखी||५९||”इवलेसे रोप लावियले द्वारी”|तयाचा वेलू गेला गागनावेरी”||(ज्ञा. महा.)पंढरपूर पालखीचे आयोजन| भक्तिधामच्या नवोल्हासाचे क्षण | महाराजांचे पंढरपुरी’ आसन|स्थापणे झाले अनिवार्य ||६०||व्यवस्थापनाने प्रयत्ंन केले|कमलाबाई इंदाणीचे सहकार्य लाभले| जागा खरेदीचे स्वप्न फळले|एकोणवीसशे शहण्णवात||६१||