Shri kshetra Bhaktidham

  • श्री महाराजांविषयी

    प्रज्ञचक्षु श्री गुलाबराव महाराजांचा जन्म माधान येथील मोहोड यांच्या कुळात त्यांच्या आजोळी अमरावती जिल्ह्यातील लोणी(टाकळी) या गावी दि. ६-७-१८८१ साली झाला.गुलाब गोंदुजी मोहोड हे त्यांचे संपुर्ण नाव. आज या गावाच्या मधोमध एक ओसाड घर आहे.तेच गुलाबराव महाराजांचे जन्मस्थान आहे असे सांगण्यात येते.वयाच्या चवथ्या वर्षापर्यंत महाराज लोणीलाच होते.अगदी बालवयात त्यांच्या डोळ्यात चुकीचे औषध टाकण्यात आल्यामुळे ते ‘जन्मांध’ बनले.त्यांचे आजोबा राणोजी मोहोड हे फार मोठे भगवदभक्त होते.तो आजाच या मुलाच्या रुपाने अवतरला असे सर्वांना वाटे. महाराजांचा बालपणीचा सारा काळ देवदेवतांची स्त्रोते म्हणण्यात व भजनात जात असे.बालपणीच त्यांना कृष्णभक्तीचा छंद जडला तो कायमचाच.

    महाराजांच्या वंशावळीत त्यांच्या रजपूत असा उल्लेख असला तरी ते स्वत:ला ‘शूद्र’(कुणबी) म्हणवून घेत.मनुष्याचं मोठेपण हे थोर कुळावर नसून त्यांच्या उच्च गुणावर अवलंबून आहे हे त्यांनी आपल्या आचरणावरून सिद्धच करुन दाखविले.

    गुलाबराव महाराजांनी पौवत्य आणि पाश्च्यात्य तत्वज्ञांच्या ग्रंथाचा सुक्ष्म अभ्यास केले होता. अरिस्टाटल, प्लेटो, साक्रेटिस काट, मिल, स्पेन्सर इत्यादिच्या वाड्मयाशी त्यांचा चांगलाच परिचय होता. याची साक्ष त्यांचे उपलब्ध ग्रंथच देतात. महाराजांची ज्ञानलालसाही फार तीव्र होती. स्वत:ला ग्रंथ वाचता येत नसल्यामुळे ते पुस्तकाची पेटी डोक्यावर घेऊन हिंडत व कुणालाही ग्रंथ वाचून मागत व त्याला काहीतरी दक्षिणा देत.

    त्यांनी ‘नावंग’ या नवीन भाषेची निर्मिती केली व एक लघुलीपीही निर्माण केली.या भाषेचा शब्दकोश व व्याकरनविशेष त्यांनी आपल्या वाड्मयाच्या पंधराव्या खंडात दिले आहे. १२३ नवीन मातावृतीची रचनाही त्यांनी केली आहे.’साधूलाही कशा प्रकारच्या अडचणी येत असतात’ हे दर्शविण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक आत्मचरित्र लिहिले.परंतु दुर्दैवाची गोष्ट अशीकी हे त्यांचे आत्मचरित्र अपूर्णच आहे.त्याची केवळ अकरा प्रकरणे उपलब्ध असून त्याने छापील ग्रंथाची ३७ पृष्टे व्यापली आहे.वरील सर्व गोष्टीवरून प्राचीन संताच्या तुलनेत त्यांचे प्रकृतीभिन्नत्व जाणवते त्यांनी गोपाळदास नामक गुरुकडून प्रारंभी गुरुपदेश घेतला होता.त्यांनी महाराजांना दत्तमंटत्र दिला. परंतु गुलाबराव महाराजांचे मन दत्तभक्तीस लागत नव्हते. त्यांची श्रीकृष्ण चरणी परमप्रीती असल्यामुळे त्यांनी आपल्या गुरुची आज्ञा घेऊन ज्ञानश्व्ररांना आपले ‘गुरु मानले.१९०१ साली गुलाबराव महाराजांना ज्ञानेश्वरानी प्रत्यक्ष दर्शन देऊन अनुग्रहित केले तो आपला अनुभव ते पुढीलप्रमाणे सांगतात. आपुला अनुभव असताप्रत्यक्ष| इतरांची कासया साक्ष| मज आडवे मांडिये घेऊनी| कृपा कटाक्षे निहाळिले||