Shri kshetra Bhaktidham

  • भक्तिधामविषयी

    ‘संत श्री गुलाबराव महाराजांचे भक्तिधाम’ हे अमरावती जिल्ह्यातील, चांदूर बाजार परिसरातील एक मोठे आकर्षण ठरले आहे. भक्तिधाम हे श्री महाराजांच्या ‘मधुराव्दैत’ संप्रदायाच्या प्रचार व प्रसाराच्या ध्येयाने प्रेरित होऊन निर्माण झाले आहे . श्री महाराज येथे साक्षात वास करीत आहे , यांचा श्रद्धावान भक्तांना आजही अनुभव येत आहे . श्री महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चांदूर नगरीतील भक्तिधाम ! मानवी मनाला विश्वबंधुत्वाचा , परिपूर्ण आनंदाचा व आत्मशांतीचा मार्ग दाखविण्याचे कार्य भक्तिधाम करते , सर्व वंश , वर्ण व जातीधर्मातील लोकांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहण्यात भक्तिधाम महत्वाची भूमिका पार पाडते . सर्वांचे ऐहिक व परलौकिक जीवन सुखाचे व आनंदाचे असावे , समाजात प्रेम , सुसंस्कार , साहिष्णुता , सात्विकता वृद्धिंगत व्हावी यासाठी लोकांनी , लोकांसाठी सुरू केलेली लोकांची संस्था म्हणजे भक्तिधाम !
    Maharajअधिक माहिती

  • श्री महाराजांविषयी

    प्रज्ञाचक्षु , ज्ञानेशकन्या संत श्री गुलाबराव महाराजांचे संपूर्ण चरित्रच अदभूत , अलोकिक आहे . त्यांचा कालखंड १८८१ ते १९१५ , बालांध , शेतकरी कुटुंबात जन्म . तसेच कोणतेही शिक्षण न घेता केवळ चौतीस वर्षाच्या अल्पायुष्टात त्यांनी ऐकूण १३३ ग्रंथांची रचना , पत्र आणि समीक्षा ११९ , अभंग २५०० , पदे २५००० , गीते १२५० , श्लोकादि कवित्व १००० , ओवी संख्या २३००० असून अंदाजे पृष्ट संख्या ६००० आहे , ही सर्व रचना संस्कृत , मराठी , हिन्दी , व्रज व वर्‍हाडी या भाषेत केली आहे . त्याची अलौकिक बुद्धिमता , भक्ति व ज्ञानवैराग्यादि हे लहान वयातच प्रगट दिसू लागली . ते मधुराव्दैत दर्शनाचे आचार्य असून त्यांनी वारकरी पंथाचीच शाखा असलेला ‘श्री ज्ञानेश्वर मधुराव्दैत संपदाय’ स्थापना केली.म्हणून त्यांना ‘मधुराव्दैताचार्य’ असे ही म्हणतात.
    bhakti dhamअधिक माहिती