Shri kshetra Bhaktidham

 • भक्तिधाम चा इतिहास :

  सद्गुरूच्या स्मारकाचा|| संकल्प होता भक्तांचा| भगवंत कृपे संकल्पपूर्तीचा |आनंदोत्सव ऐका||१३||ऐकोणवीसशे ऐक्यांशी साली| श्रींची जन्मशताब्दी झाली| प्रेमी भक्तांची साजरी केली| परी अंतरी खंत||१४|| माऊलीच्या ऐकुलत्या कन्येचे| स्मारक नव्हते विसाव्याचे| भक्तांच्या पराप्रेम भक्तीचे|शताब्दी पर्यंत||१५||स्मारकाचा विचार घोगावला | कर्म परिसरात पसरला| भक्तांच्या उत्कट प्रतिसादाला| उधाण आले||१६|| माधान ,शिरजगाव,चांदूर बाजार|महाराजांचा कर्म परिसर |त्यांच्या बाललीलांचा साशीदार| हक्कदार स्मारकाचा||१७|| चांदुर बाजार परिसरात | बोराळा नामक गावात| स्मारक विचार प्रत्यक्षात| आणण्याचे ठरले||१८||ऐकोणवीसशे सत्यांशी साली’|सतरा नोव्हेंबर या दिवशी|’सेवा संस्थेची’नोंदणी झाली|नायक मधुकर इंगोले ||१९|| गावच्या भागीरथीबाई इंगोलेंनी| सव्वा तेरा गुंठे जागा देऊनी | प्रथम दानदाता सन्मान घेऊनी |पुण्य संपादिले||

  भक्तिधाम निर्मिती :

  चांदुर बाजारचे कुर्याची भट्ट |महाराजांचे अति निकट |होते प्रेमसंबंध अती घट्ट | पितृतुल्य मानी महाराज||२२|| कुर्याजींचे पौत्र वासुदेव भट्ट |यांनी बारा हजार चौरस फूट|कुर्याजींचे समाधी निकट|दिली जागा स्मारकास ||२३|| वासुदेव भाईचे औदार्य जागले|अंत:प्रेरणने दान दिले|स्मारकांचे प्रश्न मिटविले|एकोणनव्वद साली||२४|| स्मारक चांदुरलाच व्हावे|मनी माऊलीचे असावे|भक्तश्रेष्टीचे जवळी बसावे| लाडक्या कन्यने||२५|| सर्व योगांची जुळणी झाली| कार्यकर्त्यांची फळी जमली |स्मारक वर्गणी येऊ लागली|श्रद्धेपोटी महाराजांच्या ||२६|| सेवा संस्थेची चांदुर शाखा|’भक्तिधाम’नावाने ओळखा ||महाराजांचा खेळ अनोखा |आले कर्मभूमीत || २७|| हाच होता ध्यास साधकांचा | भक्तीधांमी महाराज विसाव्याचा |त्यांच्या जीवनदायी साहित्याचा|वसा घरोघरी पोहचविण्याचा ||२८|| परंतु ऐक किंतू निघाला| महाराज असहमत स्मारकला |कसे डवलावे आज्ञेला|कुंठित झाली मति|||२९|| महाराज अंतिम आजारात|बोलले होते मनोगत |’माऊली विसावली आळंदीत’|कन्या बागडते अंगाखांध्यावर ||३०||माऊलीचे समाधीस्थळ थोर| देऊळ वाड्यात माझा जागर|तातांपासून दूरी क्षणभर||मज कैसी सहावी ||३१|| भैय्यासाहेब घटाटे धावले मदतीला|योग्य परमर्श दिला||म्हणे ‘ऊच्चासनी’बसवा माउलीला||चरणांशी महाराज’||३२|| यथार्थ पर्याय सापडला|कामाला वेग आला |सर्वांचा हातभार लागला| सर्व पंथ धर्मीयांचा||

  पूर्वीचे चित्र :

  आरंभी एक झोपडी उभारिली| महाराजांची प्रतिमा ठेवली |आरती पुजा –अर्चा सुरू झाली| अस्थायी मंदिरात ||३४|| स्मारक मंदिराची आखणी झाली|पहिली वर्गणी आली|आठ तोळे सुवर्णाची दिली|भागीरथी इंगोले बाईंनी||३५|| प्रेरणा ज्ञानेश्वर माऊलीची |पाठराखण महाराजांची |भक्तांच्या श्रम व अर्थबळाची | निघाला मूहर्त भूमीपूजनाचा||३६||एकोणवीस मे ऐकोणनव्वदला||शुभारंभाचा नारळ फुटला|भूमिपूजन समारंभ झाला|श्रीसंत शंकर महाराज हस्ते|||३७||संतकार्य संतभूमीवर| संताशिर्वादाचे बळ त्यावर |उतरोतर भक्तिधाम प्रगतीपथावर| चालणार निश्चित||३८||व्यवस्थापक मंडळ निर्माण झाले |समविचारी सहकारी जमले|विविध उपक्रम सुरू झाले |मधुरद्वैत प्रसाराचे||